Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Realme 9 Pro+ 5G : त्वरा करा! रियलमीच्या ‘या’ 5G फोनवर होतोय 24 हजार रुपयांपर्यंतचा फायदा, जाणून घ्या संपूर्ण ऑफर

Realme 9 Pro+ 5G : काही दिवसांपूर्वी रियलमीने Realme 9 Pro+ 5G हा फोन लाँच केला होता. या फोनची मूळ किंमत 31,999 रुपये इतकी आहे. परंतु कंपनीचा हा फोन तुम्ही खूप कमी किमतीत खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या फ्लिपकार्टवर बिग बचत धमाल सेल सुरु आहे. परंतु हे लक्षात घ्या की ही सेल 21 मे पर्यंत चालणार आहे. कंपनीच्या या 5G फोनवर तुम्हाला 24 हजार रुपयांपर्यंतचा फायदा होईल, त्यामुळे लवकरात लवकर हा फोन खरेदी करा.

जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीच्या या फोनमध्ये 2400×1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7 फुल एचडी + डिस्प्ले दिला जात आहे. जो 90Hz च्या रिफ्रेश दर आणि 360Hz च्या टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. तर डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनीकडून त्यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात येत आहे.

स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 8 GB रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेज पर्यायात येतो. तसेच प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये MediaTek Dimensity 920 5G चिपसेट दिला जात आहे. इतकेच नाही तर फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे दिले आहेत.

यात 2-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि 50-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरासह 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स यांचा समावेश आहे. तसेच सेल्फीसाठी या फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा इन-डिस्प्ले फ्रंट कॅमेरा आहे. कंपनीकडून फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 60W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. तर OS बद्दल बोलायचे झाले तर, हा फोन Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर काम करतो. तर कनेक्टिव्हिटीसाठी, तुम्हाला या फोनमध्ये Wi-Fi 6, ब्लूटूथ 5.2 आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय दिले जात आहेत.