Realme Narzo N53 : जर तुम्हाला स्वस्तात मस्त स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. आता तुम्ही Realme Narzo N53 हा फोन मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. यात कंपनीने 8GB RAM आणि सुपरफास्ट चार्जिंग पर्याय दिला आहे.
या फोनची किंमत 9,999 रुपये असून त्याची विक्री 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता सुरू होणार आहे. तुम्ही तो Amazon India आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करू शकता. तसेच कंपनी नवीन फोनवर 2,000 रुपयांपर्यंत सवलत देत आहे.
जाणून घ्या Realme Narzo N53 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
कंपनी आपल्या Realme Narzo N53 या फोनमध्ये 6.74 इंच डिस्प्ले देत असून हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश दरासह येतो. या फोनच्या डिस्प्लेचा टच सॅम्पलिंग रेट 180Hz इतका आहे. या फोनमध्ये देण्यात आलेली पीक ब्राइटनेस पातळी 450 nits पर्यंत असून फोन 8 GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायात तुम्हाला खरेदी करता येईल. ग्राहकांना मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने त्याची मेमरी 2TB पर्यंत वाढवता येतात. कंपनीच्या या फोनमध्ये ARM Mali G57 सह शक्तिशाली ऑक्टा-कोर चिपसेट मिळेल.
तसेच फोटोग्राफीसाठी Realme Narzo N53 या फोनमध्ये LED फ्लॅशसह 50-मेगापिक्सलचा AI कॅमेरा मिळेल. त्याशिवाय सेल्फीसाठी फोनमध्ये तुम्हाला 8 मेगापिक्सलचा AI कॅमेरा सेटअप मिळेल. कंपनीचा हा फोन 5000mAh बॅटरीसह येईल.
ही बॅटरी 33 वॉट सुपरव्हूओसी चार्जिंगला सपोर्ट आणि Realme चा हा फोन Android 13 वर आधारित Realme UI T Edition वर काम करेल. इतकेच नाही तर कनेक्टिव्हिटीसाठी यात Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि Type-C पोर्ट सारखे पर्याय मिळतील. तुम्ही हा फोन फेदर गोल्ड आणि फेदर ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.