Realme Smartphone : तयार ठेवा बजेट! शक्तिशाली फीचर्ससह लवकरच लाँच होणार सर्वात स्वस्त स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत
Realme Smartphone : सध्या भारतीय बाजारात नवनवीन स्मार्टफोन लाँच होत आहे. जवळपास सर्वच कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी या फोनमध्ये उत्तम फीचर्स देत आहे. शानदार फीचर्स आणि मागणी जास्त असल्याने हे फोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
अशातच जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा. कारण रियलमी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असणार आहे.
माहितीनुसार कंपनी सध्या नवीन C53 मॉडेलवर काम करत असून हे NBTC प्रमाणन वेबसाइटवर दिसून आले आहे, जे असे दर्शवित आहे की या फोनचा मॉडेल क्रमांक RMX3760 असा आहे. असेही सांगण्यात येत आहे की, थायलंडमध्ये सर्टिफिकेशननंतर लवकरच हा स्मार्टफोन लॉन्च करण्यात येईल. तसेच, मॉडेल नंबर शिवाय, प्रमाणन वेबसाइटवर इतर कोणतीही माहिती समोर आली नाही.
Realme C53 receives the NBTC certification and the EEC certification. RMX3761 has also received the Indian BIS certification.#Realme #RealmeC53 pic.twitter.com/cre9nWHbjF
— Mukul Sharma (@stufflistings) April 26, 2023
कशी असेल बॅटरी?
Realme C53 नुकताच FCC मध्ये दिसला असल्याने त्याचे काही स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत. RMX3760 मॉडेल नंबर असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 33W SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारी 5000mAh बॅटरी पॅक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. NBTC सूची लवकर हा फोन लॉन्च होण्याचे संकेत देत असून, मात्र अजूनही हा फोन कधी बाजारात येईल हे स्पष्ट झाले नाही.
सध्या या फोनच्या स्पेसिफिकेशन आणि फीचर्सशी निगडित कोणताही तपशील समोर आला नाही. परंतु रिपोर्टमध्ये असे सांगितले जात आहे की आगामी फोन Android 13 OS वर आधारित Realme UI 4.0 स्किनवर काम करू शकतो. या कंपनीकडून 90 Hz डिस्प्ले आणि MediaTek Helio G88 प्रोसेसर सह Realme C55 लॉन्च करण्यात आला आहे. यात 64-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.