Realme Smartphone Offer : स्मार्टफोनप्रेमींसाठी आनंदाची बातमी! 64MP कॅमेरा असणारा स्टायलिश फोन 11 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Realme Smartphone Offer : स्वस्तात नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण तुम्ही आता रियलमीचा नवीन स्मार्टफोन म्हणजे Realme Narzo N55 हा खूप कमी किमतीत खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीचा हा बजेट फोन आहे.

जो तुम्ही आता वेगवेगळ्या सवलतींमुळे सहज स्वस्तात खरेदी करू शकता. कंपनीने यात 64MP कॅमेरा दिला आहे. हा फोन एक तासात फुल चार्ज होईल असा दावा कंपनीकडून करण्यात येत आहे. जाणून घेऊयात हा फोन स्वस्तात कसा खरेदी करता येईल.

कंपनीने आपली नवीन Narzo N-सीरीज स्मार्टफोन दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरियंट 4GB+64GB आणि 8GB+128GB मध्ये लॉन्च केली आहे. हे फोन तुम्ही प्राइम ब्लू आणि प्राइम ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पहिल्याच सेलमध्ये नवीन फोनवर मोठे डिस्काउंट ग्राहकांना दिले जात आहे. या फोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही स्टोरेजची किंमत अनुक्रमे 10,999 रुपये आणि 12,999 रुपये ठेवली आहे.

मिळणार अतिरिक्त सवलती

याबाबत कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की, पहिल्या सेलमध्ये 6GB + 64GB स्टोरेजसह बेस व्हेरिएंटवर 500 रुपयांपर्यंत आणि 8GB + 128GB स्टोरेजसह 1,000 रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंटचा फायदा देण्यात येत आहे. जर तुम्हाला या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर ग्राहकांना एचडीएफसी बँकेचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा ईएमआय व्यवहार करावे लागणार आहेत. याशिवाय अशा सवलतीचा लाभ कंपनीच्या वेबसाइटवर ICICI आणि Axis Bank कार्ड्सवर देण्यात येत आहे. परंतु हे लक्षात घ्या की या सवलतीचा लाभ 21 एप्रिलपर्यंत मिळणार आहे. यादरम्यान 6 महिन्यांची अतिरिक्त वॉरंटीही देण्यात येत आहे.

जाणून घ्या वैशिष्ट्ये

कंपनीच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.72-इंच फुल एचडी + पंच-होल डिस्प्ले देण्यात येत आहे. यात 8GB पर्यंत स्थापित RAM आणि अतिरिक्त डायनॅमिक रॅमच्या पर्यायासह MediaTek Helio G88 प्रोसेसर असणार आहे. या फोनमध्ये Android 13 वर आधारित RealmeUI 4.0 सॉफ्टवेअर स्किन दिली असून जी अत्यंत स्लिम डिझाइनसह येत आहे. त्याची जाडी केवळ 7.89 मिमी इतकी आहे.

या फोनच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास फोनच्या मागील पॅनलवर 64MP AI रियर ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असणार आहे. यात 8MP सेल्फी कॅमेरा दिला असून या कॅमेऱ्यात एक्सक्लुझिव्ह स्ट्रीट फोटोग्राफी मोड आणि नाईट मोडसारखे पर्यायही उपलब्ध कंपनीने वापरकर्त्यांसाठी देण्यात येत आहेत. आगामी फोनची 5000mAh बॅटरी 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह येते. ज्यामुळे हा फोन फक्त 29 मिनिटांत शून्य ते 50% पर्यंत चार्ज केला जाईल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.