Rear seat belt rule : भारतात (India) दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. या रस्ते अपघातामध्ये (road accident) अनेकांचे मृत्यू होत आहेत. गाडी चालवत असताना किंवा पाठीमागे बसताना अनेकजण सीट बेल्टचा (seat belt) वापर करत नाहीत. त्यामुळे भारत सरकारकडून (Government of India) यासाठी नवीन नियम जारी केला आहे.
भारताच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने अखेरीस कार उत्पादकांना मागील सीट बेल्टसाठी अलार्म सिस्टम स्थापित करणे अनिवार्य करण्यासाठी मसुदा नियम जारी केला आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ‘मसुद्याच्या नियमांवर सार्वजनिक टिप्पण्यांची अंतिम तारीख 5 ऑक्टोबर ठेवण्यात आली आहे.
भारतीय उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, कार निर्मात्यांना मागील सीटबेल्ट अलार्म अनिवार्य (Seatbelt alarm mandatory) करण्याचा दबाव होता.
मिस्त्री यांच्या मृत्यूच्या दोन दिवसांनंतर, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी घोषणा केली होती की कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट घालणे अनिवार्य असेल, असे न केल्यास दंड आकारला जाईल.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा मुंबईजवळ कार अपघातात मृत्यू झाला. कारमध्ये चार जण होते, त्यापैकी मिस्त्री यांच्यासह दोघांचा जागीच मृत्यू झाला.
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री ज्या आलिशान कारमध्ये प्रवास करत होते ती गाडी वेगात होती आणि मागील सीटवर बसलेले मिस्त्री आणि जहांगीर पांडोळे यांनी सीट बेल्ट घातला नव्हता.