Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Recharge Plan : भन्नाट प्लॅन! 500Mbps इंटरनेट स्पीड आणि 3300GB डेटासह बरेच काही, अगदी कमी किमतीत घ्या आनंद

Recharge Plan : सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेकजण कमी किमतीत जास्त इंटरनेट फायदा देणारा रिचार्ज प्लॅन वापरण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे सर्वच कंपन्या स्वस्तात जास्तीत जास्त फायदे देणारे रिचार्ज प्लॅन ऑफर करत असतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

असे असतानाही ब्रॉडबँड कनेक्शन वापरणाऱ्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. इतकेच नाही तर या कंपन्या ग्राहकांना डेटासह Netflix, Amazon Prime Video आणि Disney+ Hotstar सारख्या अॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन देत आहे.

जिओ फायबर प्लॅन

जर तुम्हाला 500Mbps इंटरनेट स्पीड हवे असेल तर, तुम्हाला Jio Fiber च्या 2499 रुपयांच्या प्लॅनचे सदस्यत्व घ्यावे लागणार आहे. 12 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसाठी तुम्हाला GST ​​भरावा लागणार आहे. जर तुम्ही या प्लॅनचे वार्षिक सबस्क्रिप्शन घेतले तर तुम्हाला 30 दिवसांची अतिरिक्त वैधता मिळणार आहे.

500Mbps च्या स्पीड शिवाय कंपनीकडून या प्लान मध्ये अमर्यादित डेटा आणि कॉलिंग दिले जात आहे. या प्लॅनच्या सदस्यांना 550 पेक्षा जास्त टीव्ही चॅनेलचा प्रवेश मिळत आहे. हा प्लॅन ग्राहकांना अनेक अॅप्स शिवाय Netflix Standard, Prime Video, Disney + Hotstar, Sony Liv, Zee5 आणि Voot Select चे मोफत सबस्क्रिप्शन देतो.

टाटा प्ले फायबर

टाटा प्ले फायबर आपल्या 2300 रुपयांच्या मासिक प्लॅनमध्ये 500Mbps इंटरनेट स्पीड देत असून यात नेटवर्कवर 99.9% अपटाइमचे वचन मिळत आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरण्यासाठी 3300 GB डेटा मिळत आहे. हे लक्षात घ्या की कंपनी प्लॅनमध्ये कोणत्याही प्रकारचे OTT लाभ देत नाही.

स्पेक्ट्रा ब्रॉडबँडचा 500Mbps प्लॅन

हा प्लॅन 1699 रुपयांच्या मासिक सदस्यता शुल्कासह येत असून कंपनीचा हा 500Mbps स्पीड देणारा प्लॅन आहे. यात तुम्हाला FUP सह 500 GB डेटा मिळत आहे. या प्लॅनची ​​खासियत म्हणजे न वापरलेला डेटा पुढे वापरला जाऊ शकतो. त्यामुळे जिओ फायबरचा प्लॅन आपल्या ग्राहकांना OTT सबस्क्रिप्शनसह अनेक उत्तम फायदे देत आहे.