अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ४४३९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ९१ हजार ५४६ इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २७११ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २५ हजार ३२२ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १३६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १६६८ आणि अँटीजेन चाचणीत ९०७ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २६, अकोले ०१, कर्जत ०२, कोपरगाव ३२, नगर ग्रामीण ४०, नेवासा ०१, पारनेर १२, राहुरी ०७, शेवगाव ०१, कॅंटोन्मेंट बोर्ड ०९, मिलिटरी हॉस्पिटल ०४ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १७९, अकोले २१०, जामखेड ५६, कर्जत ३७, कोपरगाव ७५, नगर ग्रामीण १६१, नेवासा ४३, पारनेर ११५, पाथर्डी १६, राहाता १७८, राहुरी ७२, संगमनेर २३८, शेवगाव ५३, श्रीगोंदा ३९, श्रीरामपूर १४४, कॅंटोन्मेंट बोर्ड ०२ , इतर जिल्हा ४८ आणि इतर राज्य ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ९०७ जण बाधित आढळुन आले. मनपा ४५, अकोले ६४, जामखेड ०६, कर्जत ९२, कोपरगाव ६९, नगर ग्रामीण ६७, नेवासा ५१, पारनेर ११७, पाथर्डी ७६, राहाता ३८, राहुरी ८९, संगमनेर १८, शेवगाव १२, श्रीगोंदा ९६, श्रीरामपूर ५२, कॅंटोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७५३, अकोले २०३, जामखेड १३०, कर्जत २४२, कोपरगाव २३८, नगर ग्रामीण ४६४, नेवासा १५४, पारनेर २८३, पाथर्डी १४४, राहाता २८०, राहुरी २१३, संगमनेर ३८६, शेवगाव १५१, श्रीगोंदा ३००, श्रीरामपूर २८३, कॅन्टोन्मेंट ८९, मिलिटरी हॉस्पिटल ०९, इतर जिल्हा १०६ आणि इतर राज्य ११ अशा रुग्णांचा समावेश आहे.