रेकॉर्डब्रेक ! जिल्ह्यात एकाच दिवसात एवढ्या नागरिकांना कोरोना लसीचा डोस

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक कार्यक्रमात महाराष्ट्रानं विक्रमी कामगिरी केली आहे. यातच जिल्ह्यात देखील शनिवारी लसीकरणाबाबत एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

जिल्हा परिषदे प्राथमिक आरोग्य, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून शनिवारी पहिल्यांदा 62 हजार नागरिकांना एकच दिवशी करोना लसींचा डोस देण्यात आला आहे. यापूर्वी मागील आठवड्यात हा 53 हजार होता.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी जाणिवपूर्वक दोन दिवसांपासून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय आणि मनपा आरोग्य केंद्रात येणार्‍या लसींचे त्याच दिवशी वेगवेगळ्या सत्रांचे आयोजन करून नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला.

पूर्वीच्या काळात जिल्ह्याला दररोज येणार्‍या डोसची संख्या कमी होती. त्यात आता वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. यामुळे येणार्‍या डोसचे लगेच त्याच दिवशी विनियोग करण्याचा निर्णय जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. क्षीरसागर यांनी घेतला.

जिल्ह्यातील लसीकरणाची परिस्थिती जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत आरोग्य विभागाने 18 लाख 75 हजार नागरिकांचे लसीकरण केलेले आहेत. यात करोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ही 13 लाख 53 415 असून दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या ही 5 लाख 21 हजार 669 अशी आहे.

Ahmednagarlive24 Office