SAIL Recruitment: स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने मॅनेजमेंट ट्रेनी पदाच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. 245 पदांसाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. 3 नोव्हेंबरपासून sail.co.in वर नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर ठेवण्यात आली आहे.
पदाची संख्या पुढीलप्रमाणे-
– मेकॅनिकल अभियांत्रिकी – 65 पदे
– धातू अभियांत्रिकी – 52 पदे
– इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी – 59 पदे
– इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी – 13 पदे
– खाण अभियांत्रिकी – 26 पदे
– केमिकल अभियांत्रिकी – 14 पदे
– स्थापत्य अभियांत्रिकी – 16 पदे.
वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता –
23 नोव्हेंबर 2022 रोजी कमाल वयोमर्यादा 28 वर्षे असावी. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल. तसेच उमेदवार 65 टक्के गुणांसह अभियांत्रिकी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
याप्रमाणे अर्ज करा –
– उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट sail.co.in वर जा.
– मुख्यपृष्ठावरील करिअरवर क्लिक करा
– सूचना वर क्लिक करा
– खाली स्क्रोल करा आणि एमटी रिक्रूटमेंट वर क्लिक करा
– त्यानंतर फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करा.
– सबमिट करा.
निवड कशी होईल –
GATE 2022 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. निवडीसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा, जीडी आणि मुलाखतीत उपस्थित राहावे लागेल. या पदांवर निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना 50,000 ते 1,80,000 रुपये पगार दिला जाईल. अधिक तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना पहा.