पैसे अडकल्याने वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीच्या युवकांची नियुक्ती !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- संगमनेरातील सय्यद बाबा चौकातील एका भिशीचालकाने भिशीचे पैसे वसूल होत नसल्याने त्रस्त होऊन विषारी पदार्थ सेवन केला होता.

या प्रकारामुळे शहरातील इतर भिशीचालक सावध झाले आहेत. यामुळे सर्व भिशीचालक एकवटले असून त्यातील काहींनी पैसे वसुलीसाठी गुंड प्रवृत्तीच्या युवकांची नियुक्ती केली आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शहरातील एका भिशीचालकाने भिशीचे पैसे वसूल होत नसल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने यासाठी14 जणांना जबाबदार धरले होते. या 14 जणांनी लाखो रुपये बुडवून या भिशीचालकाला दमदाटी केली होती.

पैशाचा तगादा इतरांनी लावल्याने त्याने आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेमुळे भिशी व्यवसायात चालणारे गैरप्रकार उघडकीस येत आहेत. शहरामध्ये अनेकजणांकडे लाखो रुपयांच्या भिशा आहेत.

आपले पैसे वसूल व्हावेत यासाठी हे सर्वजण सावध झाले आहेत. त्यांनी यासाठी पैसे मोजून गुंड प्रवृत्तीच्या युवकांची नेमणूक केली आहे.

दरम्यान जे भिशी चालक वसुलीसाठी मग्रुरी करताना दिसत होते तेच भिशी चालक आता सदस्यांशी गोड भाषेत बोलताना दिसत आहेत. गोड बोलून पैसे वसूल करण्याकडे त्यांचा कल वाढला आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24