Maharashtra Police Recruitment 2022 : राज्यातील १२ वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण राज्यातील पोलीस खात्यात १८००० हजाराहून अधिक जागांची भरती निघाली आहे. त्यासाठी आजपासून अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्र पोलिसांनी कॉन्स्टेबल पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे, ते महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत वेबसाइट mahapolice.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
या पदांसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून म्हणजेच 9 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. याशिवाय, उमेदवार https://www.mahapolice.gov.in/ या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात.
तसेच, या लिंकद्वारे महाराष्ट्र पोलिस भरती 2022 अधिसूचना 1 महाराष्ट्र पोलिस भरती 2022 अधिसूचना 2 आणि महाराष्ट्र पोलिस भरती 2022 अधिसूचना 3 तुम्ही अधिकृत अधिसूचना देखील पाहू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 18334 पदे भरली जातील.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 च्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – 09 नोव्हेंबर 2022
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी रिक्त जागा तपशील
एकूण पदांची संख्या- 18334
पोलीस कॉन्स्टेबल – 14956
SRPF पोलीस कॉन्स्टेबल-1204
ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल – 2174
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी पात्रता निकष
उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच महाराष्ट्र पोलिस ड्रायव्हर पदांसाठी, ड्रायव्हिंगचा अनुभव असलेला ड्रायव्हिंग लायसन्स असणे अनिवार्य आहे.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे दरम्यान असावी.
महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी चाचणी, शारीरिक सहनशक्ती चाचणी, चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी, वैद्यकीय चाचणी इत्यादींच्या आधारे केली जाईल.