Redmi 12C : अप्रतिम ऑफर! 45% स्वस्तात खरेदी करा रेडमीचा सर्वात लोकप्रिय फोन, ‘या’ ठिकाणी मिळत आहे संधी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi 12C : जर तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा, घाई करू नका. कारण आता तुम्ही मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात रेडमीचा स्मार्टफोन खरेदी करू शकता. कंपनीच्या वेबसाइटवर तुम्हाला ऑफर मिळत आहे.

तुम्ही आता Redmi 12C हा फोन 45 टक्के सवलतीत खरेदी करू शकता. किमतीचा विचार केला तर खरंतर Redmi 12C या फोनची किंमत 13,999 रुपये इतकी आहे. परंतु तुम्ही सवलतीमुळे 7,599 रुपयांमध्ये डिस्काउंटनंतर खरेदी करू शकता. ग्राहकांसाठी या फोनमध्ये व्हर्चुअल रॅम सह 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. जाणून घेऊयात संपूर्ण ऑफर आणि फीचर्स.

जाणून घ्या Redmi 12C फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

कंपनीचा Redmi 12C हा फोन 6.71 इंच HD डिस्प्लेने सुसज्ज असून हा डिस्प्ले 60Hz च्या रीफ्रेश दर आणि 120Hz च्या टच सॅम्पलिंग दरासह येतो. या स्मार्टफोनमध्ये ऑफर करण्यात आलेल्या या डिस्प्लेची शिखर ब्राइटनेस पातळी 500 nits पर्यंत आहे.

स्टोरेजचा विचार केला तर हा फोन 6 GB पर्यंत रॅम आणि 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेजने सुसज्ज आहे.या फोनमध्ये तुम्हाला 5 GB पर्यंत व्हर्चुअल रॅम मिळेल. गरज असेल तर तुम्ही फोनची मेमरी 1 TB पर्यंत वाढवू शकता. इतकेच नाही तर प्रोसेसर म्हणून, कंपनी माली G52 MC2 सह MediaTek Helio G85 चिपसेट देत आहे.

त्याशिवाय वापरकर्त्यांना फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर त्याच वेळी, कंपनी सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देत असून या फोनमध्ये तुम्हाला 5000mAh ची बॅटरी पाहायला मिळेल.

ही बॅटरी 10 वॅट मायक्रो USB चार्जिंगला सपोर्ट करते. फोनच्या OS बद्दल सांगायचे झाले तर हा फोन Android 12 वर आधारित MIUI 13 वर काम करेल. तर कनेक्टिव्हिटीसाठी, फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट, वाय-फाय 802.11 a/b/g/n/ac, ब्लूटूथ 5.0 आणि 3.5mm हेडफोन जॅक सारखे पर्याय मिळतील.