ताज्या बातम्या

Redmi चा नवा रेडमी 10 हा स्मार्टफोन झाला लॉन्च; जाणून घ्या फीचर्स, किंमत

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :-  बाजारात दरदिवशी नवनवीन स्मार्टफोन दाखल होत असतात. बदलत्या फीचर्समुळे हे फोन देखील काही वेळातच लोकप्रिय बनतात.

आता बाजरात नुकताच शाओमीचा सब ब्रँन्ड Redmi चा नवा रेडमी 10 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेस्ड रेट सपोर्ट दिला गेला आहे.

तसेच फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. या व्यतिरिक्त मोठी बॅटरी आणि Helio G- सीरिज चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.(अवघ्या 26 हजारांमध्ये Apple iPhone 12 Mini खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर बद्दल अधिक)

जाणून घ्या काही आकर्षक फीचर्स :- Redmi 10 2022 एक लाइटवेट स्मार्टफोन आहे. फोनचे वजन 181 ग्रॅम आहे. फोनमध्ये एक 6.5 इंचाचा पंचहोल डिस्प्ले दिला गेला आहे. फोन तीन कलर ऑप्शन कार्बन ग्रे, पॉबेल व्हाइट आणि सी ब्लू रंगात येणार आहे.

बॅटरी बॅकअप :- रेडमी 10 2022 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. फोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. तसेच 9W रिवर्स चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे. रिटेल पॅकेजमध्ये डिवाइस 22.5W चार्जर सपोर्टसह येणार आहे.

इतर फीचर्स :- फोनमध्ये फेस अनलक आणि एक साइड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे. डिवाइस डेडिकेट मायक्रो एसडी कार्ड स्लॉट, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, एनएफसी आणि युएसबी- सी पोर्ट दिला गेला आहे. फोनमध्ये ड्युअल स्पीकर्स, 3.5mm ऑडिओ जॅक दिला गेला आहे.

Ahmednagarlive24 Office