Redmi चा ‘हा’ पावरफुल फोन झाला स्वस्त ! आता होणार हजारोंची बचत ; जाणून घ्या ऑफेरबद्दल सर्वकाही

Redmi Note 11 Pro Plus Discount: नवीन वर्षांपूर्वी तुम्ही देखील स्मार्टफोन खरेदी करणार असला तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तुम्ही या संधीचा लाभ घेऊन हजारो रुपयांची बचत करू शकतात.

तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या Amazon वर सुरु असणाऱ्या सेलमध्ये तुम्ही Redmi Note 11 Pro Plus 5G या स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट प्राप्त करू शकतात आणि तुमचे हजारो रुपये वाचवू शकतात. Redmi Note 11 Pro Plus 5G 108MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह येतो तसेच 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेजचा पर्याय आहे. फोन 67W च्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. यात 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED स्क्रीन आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Redmi Note 11 Pro+ 5G किंमत

Redmi चा हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो. त्याच्या 6GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 19,999 रुपये आहे. ICICI बँक कार्डवर यावर 2000 रुपयांची सूट उपलब्ध आहे. यानंतर तुम्ही हा फोन 17,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता.

तर हँडसेटच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 22,900 रुपये आहे. या व्हेरियंटवर तुम्हाला सूटही मिळत आहे. फोन फँटम व्हाईट आणि स्टेल्थ ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो.

फीचर्स

Redmi Note 11 Pro Plus 5G स्मार्टफोन 6.67-इंचाच्या सुपर AMOLED डिस्प्लेसह येतो. स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास 5 संरक्षणासह येते. हँडसेट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर काम करतो.

स्मार्टफोन 108MP मुख्य लेन्ससह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत. समोर 16MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनला उर्जा देण्यासाठी, 5000mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनसोबतच तुम्हाला बॉक्समध्ये चार्जर देखील मिळतो. सुरक्षेसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

हे पण वाचा :- Cheapest 3 Sporty Cars: स्वस्तात मस्त ! ‘ह्या’ आहेत सर्वात स्वस्त 3 स्पोर्टी कार्स ! किंमत आहे फक्त ..