Redmi Smart TV : स्वस्तात मिळतोय Redmi चा 43 इंचाचा टीव्ही, त्वरित घ्या संधीचा लाभ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi Smart TV : जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक शानदार संधी आहे. आता तुम्ही मूळ किमतीपेक्षा रेडमीचा 43 इंचाचा टीव्ही सहज खरेदी करू शकता. तुमच्यासाठी अशी ऑफर नवीनतम रेडमी स्मार्ट फायर टीव्ही 4K 43 इंच टीव्ही वर मिळत आहे. ज्यामुळे तुमची हजारोंची बचत होईल. कसे ते जाणून घ्या.

जाणून घ्या Redmi Smart Fire TV 4K 43 इंच किंमत

किमतीचा विचार केला तर भारतीय बाजारात Redmi Smart Fire TV 4K 43 इंच टीव्ही 26,999 रुपयांना उपलब्ध करून दिला आहे. परंतु लॉन्च ऑफर अंतर्गत, हा स्मार्ट टीव्ही 24,999 रुपयांना खरेदी केला जाईल. तो तुम्ही Xiaomi च्या वेबसाइट आणि Amazon India वर खरेदीसाठी उपलब्ध करून दिला आहे. तसेच लॉन्च ऑफरचा भाग म्हणून, तुम्हाला नवीन टीव्हीवर 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी मिळेल.

जाणून घ्या फीचर्स

Redmi च्या नवीन स्मार्ट टीव्हीमध्ये 43-इंच स्क्रीनसह मेटल बेझल-लेस डिझाइन देण्यात आले आहे. टीव्हीमध्ये देण्यात आलेली 43 इंची स्क्रीन 4K (3840 x 2160 पिक्सेल) रिझोल्यूशन देत आहे. तर स्क्रीन 178-डिग्री व्ह्यूइंग अँगल, विविड पिक्चर इंजिन आणि ऑटो लो लेटेंसी मोडसह येईल.

या स्मार्ट टीव्हीमध्ये दोन 12W स्पीकर उपलब्ध करून दिले आहेत जे डॉल्बी ऑडिओला सपोर्ट करतात. तसेच याच्या स्पीकर्सना DTS-HD आणि DTS Virtual:X सपोर्ट दिला आहे. याच्या सॉफ्टवेअरबद्दल सांगायचे झाले तर नवीन टीव्ही फायर OS 7 सह येईल. या टीव्हीसोबत अलेक्सा-व्हॉइस सपोर्टसह रिमोट दिला आहे.

या स्मार्टटीव्हीमध्ये क्वाड-कोर कॉर्टेक्स A55 प्रोसेसर देण्यात आली आहे. यात माली G52 MC1 GPU ग्राफिक्ससाठी उपस्थित असून 2GB रॅम आणि 8GB इनबिल्ट स्टोरेज दिले आहे. तर कनेक्टिव्हिटीसाठी, या स्मार्ट टीव्हीमध्ये Wi-Fi 802.11 ac, Miracast, AirPlay 2, Bluetooth 5.0, तीन HDMI पोर्ट, दोन USB 2.0 पोर्ट, 3.5 mm ऑडिओ जॅक, इथरनेट पोर्ट यांसारखी फीचर्स दिली आहेत.