Redmi smartphone : मार्केटमध्ये येतोय Redmi चा जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन, देणार सर्व स्मार्टफोनला कडवी टक्कर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi smartphone : रेडमीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. कंपनी लवकरच मार्केटमध्ये Redmi 12 Pro Plus हा स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन Redmi Note 12 5G सीरीजचा एक भाग आहे.

सध्या तो चीनमध्ये लाँच केला आहे. लवकरच कंपनी भारतीय बाजारात लाँच करणार आहे. Redmi चा हा 5G स्मार्टफोन असणार आहे.कंपनी यामध्ये जबरदस्त फीचर्स देऊ शकते.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

या नवीन फोनमध्ये ग्राहकांना कंपनी 6.67-इंच फुल एचडी OLED स्क्रीन देत असून त्याचा 120Hz चा रिफ्रेश दर आहे. तसेच MediaTek Dimensity 1080 चिपसेट असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये 12GB पर्यंत LPDDR4X रॅम उपलब्ध करून दिली जाऊ शकते. याशिवाय या मोबाईलच्या बेस मॉडेलमध्ये 256GB इंटरनल स्टोरेजसह 8GB रॅम आहे.

फोटोग्राफीचा विचार केला तर याच्या मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. ज्याचा मागील प्राथमिक कॅमेरा 200MP तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी फोनच्या समोर 16MP कॅमेरा आहे.यामध्ये 5,000mAh ची बॅटरी असण्याची शक्यता आहे. 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील उपलब्ध आहे.

हा एक मिड-रेंजचा स्मार्टफोन असून याची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये 2,099 युआन (सुमारे 23,000 रुपये) च्या सुरुवातीच्या किंमतीला येतो. तर भारतातही या स्मार्टफोनची चिनी मॉडेल सारखी फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर कंपनीचे खूप स्मार्टफोन कमी बजेटमध्ये उपलब्ध असून ते तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता.