Redmi TV A75 : Redmi ने आणला 75 इंच स्वस्त 4K स्मार्ट टीव्ही, किंमत असेल 35 हजारांपेक्षा कमी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Redmi TV A75 : जर तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर जरा इकडे लक्ष द्या. कारण सर्वात लोकप्रिय कंपनी रेडमीने आपला 75 इंच स्वस्त 4K स्मार्ट टीव्ही बाजारात आणला आहे. जो तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता.

Redmi ने आता आपला नवीन TV Redmi TV A75 2024 लाँच केला आहे ज्याचा आकार 75 इंच 4K स्क्रीन आहे. किमतीचा विचार केला तर या टीव्हीची किंमत 35 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. जाणून घ्या या टीव्हीचे फीचर्स.

जाणून घ्या Redmi TV A75 2024 चे फीचर्स

महत्त्वाचे म्हणजे की Redmi TV A75 2024 प्रीमियम बेझल-लेस डिझाइनसह येतो. त्यात मेटल बॉडी आणि 75-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे पॅनल 4K रिझोल्यूशन ऑफर करते जे 120Hz रिफ्रेश रेटला समर्थन देत असून यात 2 पेक्षा कमी रंगाची अचूकता डेल्टा ई आहे. विशेष म्हणजे हे 1.07 अब्ज रंगांना समर्थन देते.

रॅम आणि स्टोरेज स्पेस

A75 2024 मॉडेलमध्ये प्रति स्पीकर 10W सह एकूण स्पीकर आउटपुट 20W देण्यात आला आहे. जो स्पष्ट आणि मोठा आवाज देण्यासाठी पुरेसे आहे. टीव्ही क्वाड-कोर A35 चिपसह सुसज्ज आहे. स्टोरेजचा विचार केला तर हा टीव्ही 2GB RAM आणि 32GB स्टोरेज स्पेससह जोडला आहे. इतकेच नाही तर डिव्हाइस 5G Hz आणि 2.4G Hz वर ड्युअल-बँड वाय-फायला समर्थन देते.

जाणून घ्या टीव्हीची किंमत

Redmi TV A75 2024 फक्त चीनमध्ये लॉन्च केला आहे. परंतु तो जागतिक बाजारपेठेत कधी लॉन्च होईल, याबद्दल सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. त्याची किंमत 3099 युआन असून जी अंदाजे $412 (म्हणजे अंदाजे 35 हजार रुपये) इतकी आहे. हा टीव्ही तुम्ही अधिकृत Xiaomi वेबसाइट आणि Jingdong द्वारे खरेदी करू शकता.