Redmi Upcoming Smartphone : नववर्षाच्या स्वागताला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा वेळी नववर्षाच्या मुहूर्तावर भारतात 5 जानेवारी रोजी नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.
या स्मार्टफोनचे नाव Redmi Note 12 Pro 5G असे असेल. तसेच हा फोन Redmi Note 12 Pro+ 5G सह लॉन्च केला जाईल. कंपनीने सोमवारी जाहीर केले की हा मिडरेंज स्मार्टफोन कंपनीच्या Note 12 सीरीज अंतर्गत लॉन्च केला जाईल. या सीरीज अंतर्गत, Redmi Note 12, Note 12 Pro आणि Note 12 Pro+ पहिल्यांदा चीनमध्ये ऑक्टोबरमध्ये लॉन्च करण्यात आले होते.
दरम्यान, Redmi च्या वेबसाइटवर एक टीझर इमेज जारी करून, अशी माहिती देण्यात आली आहे की Redmi Note 12 Pro भारतात 5 जानेवारी रोजी लॉन्च केला जाईल.
Redmi Note 12 Pro 5G चे स्पेसिफिकेशन
टीझरनुसार, या फोनच्या मागील बाजूस ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50MP प्राथमिक कॅमेरा उपलब्ध असेल. तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की Redmi Note 12 Pro + 5G देखील त्याच दिवशी लॉन्च होईल.
रिलीज झालेल्या टीझरमध्ये असे सांगण्यात आले आहे की Redmi Note 12 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह प्रो AMOLED डिस्प्ले देखील उपलब्ध असेल. फोनमध्ये MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर असेल अशीही माहिती कंपनीने दिली आहे.
सध्या कंपनीने चार्जिंग किंवा बॅटरीच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल माहिती दिलेली नाही पण 15 मिनिटे चार्ज केल्यानंतर हा फोन दिवसभर चालू शकेल असे सांगितले आहे.
कंपनीने असेही म्हटले आहे की आगामी हँडसेटमध्ये फ्लॅगशिप हॅप्टिक अनुभव देखील उपलब्ध असेल. भारतात Redmi Note 12 Pro 5G च्या किमतीबद्दल कंपनीने सध्या काहीही सांगितलेले नाही. तथापि, चीनमध्ये त्याची प्रारंभिक किंमत CNY 1699 (सुमारे 19,300 रुपये) पर्यंत ठेवण्यात आली आहे.