आरोपी मृत्यूप्रकरणी पोलीस अधीक्षक म्हणाले…दोषींवर कारवाई होणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- पोलिसांच्या ताब्यात असताना जखमी झालेला आरोपी सादिक लाडलेसाहब बिराजदार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याघटनेची संपूर्ण चौकशी व शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा पोलीस दलाने घेतला आहे.

याला पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दुजोरा दिला. दरम्यान भिंगार पोलीस हद्दीमध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झालेल्या सादिक बिराजदार या तरुणाचा दफनविधी रात्री 3 च्या सुमारास पार पडले. यावेळी नागरिकांसह पोलिसांची देखील मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

यावेळी डीवायएसपी संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी प्रत्येक घटनेवर बारीक लक्ष देत कोणती ही चूक न होऊ देता ही दफनविधी शांततेत पार पडली.

नेमके प्रकरण काय ? जाणून घ्या सविस्तर आरोपी सादिकला भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे कर्मचारी शेख आणि पालवे ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना भिंगार नाला परिसरात सादिकला पाच जणांनी मारहाण केली असल्याची फिर्याद सादिकची पत्नी रुक्सार बिराजदारने दिलेली आहे.

त्यानुसार पाच जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल आहे. मात्र, आरोपी सादिकला पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना त्याने चालू वाहनातून उडी मारली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक काय म्हणाले? घडलेली घटना दुर्दैवी असून यासंदर्भात चौकशी सुरू आहे.

चौकशीसाठी काही लोकांना ताब्यात घेतले आहे. नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक यांना घटनेचा अहवाल सादर केला आहे.दरम्यान डेडबॉडीचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर सादिकचा मृत्यू कशामुळे झाला याचा उलगडा होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24