लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-राज्यात कोरोना रुग्ण वाढू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे.

विविध जिल्ह्यांत रुग्ण वाढ होऊ लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.यातच आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे महत्वपूर्ण वक्तव्य आले आहे.

राज्यातील तसेच मुंबईतील वाढत चाललेली कोरोना रुग्णांची संख्या पाहता राज्य सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.परंतू राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा कोणताही विचार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.

मुंबई लोकल ट्रेनमध्ये कोणत्याही प्रकारचं सोशल डिस्टेंसिंगचं पालन होत नाही. १ फेब्रुवारीपासून ठराविक वेळेत राज्य सरकारने सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकल सेवा सुरू केली आहे.

तेव्हापासून दिवसाला ३० लाखांहून अधिक लोक उपनगरीय रेल्वेतून प्रवास करत आहेत. आता १० दिवसांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने पुन्हा लोकल ट्रेनमध्ये होणाऱ्या गर्दीकडे सर्वांचे लक्ष जात आहे.

तज्ज्ञांच्या मते रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याला लोकल ट्रेनमधील गर्दीला जबाबदार धरलं जाऊ शकत नाही, काहींच्या मते, आठवड्याच्या शेवटी चाचणीची संख्या कमी होते आणि आठवड्याच्या सुरुवातीला पुन्हा चाचणी वाढते.

अहमदनगर लाईव्ह 24