राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव मोहन वाघ निलंबित

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :-महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलसचिव मोहन रामभाऊ वाघ यांचे निलंबन करण्यात आलेे आहे. तसे पत्र विद्यापीठ प्रशासनाला प्राप्त झाले. निलंबनाच्या कारवाईबाबत वेगवेगळ्या चर्चा आहेत. कुलसचिव पदाचा कारभार महानंद माने यांच्याकडे दिला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत कुलसचिव मोहन वाघ त्याचे पुर्ण सेवा काळात वादग्रस्त राहिला आहे.

कृषी विभागाचे उद्यान विद्या रोपवाटिकेतील भ्रष्टाचार, नाशिक जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे जाणीव पुर्वक गोपनीय अहवाल कमी प्रतवारीचे लिहिल्याचे निष्पन्न झाल्याने नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वाघ यांच्या वर ठपका ठेवला व त्यांची विभागीय आयुक्तांकडे विभागीय चौकशी चालू केली.

सदर विभागीय चौकशी चालू असताना शासनाच्या २०१६ घ्या प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्याच्या धोरणास नुसार वाघ यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव पदावर नियुक्ती झाली.सदर नियुक्ती स सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी शासनस्तरावर तक्रार केली तसेच अवैध निवड प्रक्रिया बाबत pil/७४४३/२०२१ औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

त्या अनुषगाने मा राज्यपाल यांनी मुख्य सचिव (कृषी) यांना तात्काळ कार्यवाही करण्याबाबतचे आदेश दिले होते.तसेच मोहन वाघ नाशिक कृषी आयुक्त कार्यालयात असताना तेथील शेतकरी व कर्मचारी यांना त्रास दिल्याच्या तक्रारी वरून कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी वाघ यांची उचलबांगडी करण्यात येऊन अकोला येथे शिक्षा म्हणून बदली केली होती

परंतु वाघ यांची पुन्हा अवैध मार्गाने विद्यापीठाचे कुलसचिव म्हणून निवड झाली. वाघ यांनी अवैध मार्गाने संपत्ती गोळा केले बाबत त्याची शासनस्तरावर चौकशी होऊन त्याचे विरूद्ध कार्यवाही व्हावी अशा तक्रारी दाखल असल्याचे समजते.वाघ महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे रुजू झाल्यानंतर अनेक कर्मचारी यांना जाणीवपूर्वक त्रास दिला.

अधिष्ठाता, संशोधन संचालक व कुलगुरू यांना चुकीचे पध्दतीने सांगुन बदल्या केल्या कर्मचारी यांचे पगार थांबविले. कुलगुरू ची मान्यता न घेता फाईल व परिपञक बनविले.अधिष्ठाता, संशोधन संचालक ,कुलगुरू व मंत्री महोदय यांनी दिलेल्या सुचना कडे दुर्लक्ष केले.

कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील साहेब यांनी मोहन वाघ यास निलंबित करण्याचे घेतलेल्या निर्णयां मुळे सर्व विद्यापीठांमध्ये निर्णय योग्य घेतल्या ची चर्चा कृषी विभागातील व विद्यापीठ कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

मोहन वाघ यांचे जागेवर माने यांनी कार्य भार स्विकारले नंतर विद्यापीठ मध्ये निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती संपली असून दैनंदिन कारभार सुरळीत चालू झाल्या मुळे कर्मचारी शेतकऱ्यांनी कुलगुरूचे अभिनंदन करून आभार मानले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24