ई-पीक पाहणी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ८५ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 9 सप्टेंबर 2021 :- ई-पीक पाहणी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ८५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र प्रत्यक्ष माहिती भरताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

दरम्यान शेतकऱ्यांना स्वत:चा पेरा स्वत:च्या मोबाईलमधून भरता यावा, यासाठी ही योजना सुरु करण्यात आली होती. राज्य शासनाने १५ ऑगस्ट २०२१ पासून ई-पीक पाहणी प्रकल्प सुरू केला आहे.

याअंतर्गत माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा, या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना स्वत:चा पेरा स्वत:च्या मोबाईलमधून भरता यावा, यासाठी हा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. त्यानुसार नगर जिल्ह्यात तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल यांनी यासाठी नियाेजन केले आहे.

याच्या अंमलबजावणीसाठी कृषी विभागही मदत करत आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांतील ८५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यामध्ये प्रत्यक्ष वापरात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अनेक शेतकऱ्यांना मोबाईल वापराचेही पुरेसे ज्ञान नसल्याने त्याही अडचणी आहेत. प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांनी ॲपवर पीक पेऱ्याची माहिती भरली, याचा तपशील मात्र महसूल विभागाकडून उपलब्ध होऊ शकला नाही.