अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याचा बुधवारी जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. बोठे याच्यावतीने न्यायालयात ॲड. महेश तवले तर फिर्यादी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकिल ॲड. उमेशचंद्र यादव पाटील व ॲड. सचिन पटेकर यांनी युक्तीवाद केला होता.
आरोपी बाळ बोठे याने सुपारी देऊन ३० नोव्हेंबर २०२० रोजी जरे यांची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. बोठे सध्या पारनेर येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.
त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. आरोपीने केलेला गुन्हा गंभीर आहे. या गुन्ह्याच्या संदर्भातील सर्व पुरावे पोलिसांनी न्यायालयासमोर आणले आहेत.
जामीन मिळाला तर आरोपी फरारहोऊ शकतो तसेच साक्षीदारांवर दबाव आणू शकतो.बोठे याने रेखा जरेंशी वितुष्ट आल्यानंतर कट रचून शांत डोक्याने त्यांची हत्या घडवून आणली आहे.
खुनाच्या घटनेनंतर अटकेच्या भीतीने शंभरपेक्षा जास्त दिवस तो तेलंगणा राज्यात लपून बसला होता.आरोपीचे वर्तन लक्षात घेत त्याला जामीन देऊ नये, असा युक्तीवार सरकारी पक्षाच्यावतीने ॲड. यादव यांनी केला होता.