रेखा जरे हत्याकांड : बाळ बाेठेच्या ‘त्या’ सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- स्टॅडिंग वाॅरंटला स्थगिती मिळवण्यासाठी बाळ बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अर्ज केला आहे. त्यावर शनिवारी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने आपले म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली आहे. त्यावर पुढील सुनावणी मंगळवारी (९ फेब्रुवारी) होणार आहे.

सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांंच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या विरोधात पारनेर न्यायालयाने स्टॅँडिंग वाॅरंट बजावलेले आहे. या वाॅरंटला स्थगिती मिळावी, या साठी बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयाकडे र्हज केला आहे. त्यावर न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्यासमाेर शनिवारी सुनावणी झाली.

सरकारी वकील ए. डी. ढग यांनी सरकारी पक्षातर्फे म्हणणे सादर करण्यसाठी मुदत मागितली आहे. जरे खून प्रकरणत बोठे हा मुख्य सूत्रधार असून तो गेल्या दोन महिन्यांपासून फरार आहे. जातेगाव फाट्यावर जरे यांची हत्या कारण्यात आली. ३० नाेव्हेंंबरला रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.

दरम्यान, बोठे याने सुरवातील जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. ताे फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला.

खंडपीठातही हा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर बोठे याने स्टँडिंग वॉरंटच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालय आव्हान दिले आहे. त्यावर होणाऱ्या पुढील सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24