ताज्या बातम्या

Relationship tips in marathi : दूरवरील नातेसंबंध टिकवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- वर्षानुवर्षे नातेसंबंध टिकवून ठेवणे ही भारतात नवीन संकल्पना नाही. मात्र हल्ली वाढत्या जागतिकीकरणामुळे आणि देशभरात होत असलेल्या वेगवान विकासामुळे नातेसंबंधात थोडेफार अंतर पडत असून अशा नातेसंबंधांना टिकवून ठेवणे महत्त्वाचे बनले आहे.

विशेष म्हणजे प्रत्येक जोडप्याला कधी ना कधी नातेसंबंधातील अंतराचा सामना करावा लागतो. वाढीव शिक्षण, सांस्कृतिक परिपक्कता आणि आपल्या जीवनात डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रवेशामुळे नातेसंबंधांचे रक्षण करण्याचे मूल्य आणि महत्त्व वाढले आहे. म्हणूनच दूरीयाँ नजदिकिया बनविण्याची जबाबदारी अलीकडच्या पिढीवर विशेषत्वाने आली आहे.

एकमेकांपासून लांब राहत असलेल्या जोडप्यांचे २0१८ मध्ये सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये असे आढळून आले की, २७ टक्के जोडपी ही कधीच एकमेकांच्या जवळ राहली नाहीत, तर सर्वेक्षणातील सुमारे ५0 टक्के जोडपी ही एकमेकांना ऑनलाइन भेटले होते.

मुंबईच्या मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या समुपदेशन मानसशास्त्रज्ञ हिरक पटेल यांच्याशी एका वृत्तसंस्थेने चर्चा केली असता, त्यांनी जोडप्यांना दूरच्या नातेसंबंधात जुळवून घेण्याच्या काही पद्धती सांगितल्या. त्या आपण समजून घेऊयात :

१. परस्पर स्वीकार : – या टप्प्यात व्यक्‍ती शारीरिकदृष्ट्या तुमच्या आसपास असणार नाही, याचा स्वीकार करा. यामध्ये नोकरीतील बदल किंवा नोकरी जाणे, आर्थिक गरजा, कौटुंबिक परिस्थिती किंवा इतर कोणतीही कारणे यामागे असू शकतात. या कारणांना स्वीकारा. कारणे ही बदलणारी देखील असू शकतात. या कारणांचा स्वीकार हा दांपत्याला त्यांच्या नातेसंबंधात आशेचा दिवा ठरते.

२. वार्तालाप करत राहा : – जेव्हा लोक लांब पल्ल्याच्या नात्यात असतात, तेव्हा सतत एकमेकांशी बोलत राहणे, वार्तालाप किंवा चर्चा करत राहणे हा नातेसंबंधात एक महत्त्वाचा पैलू असतो. सत्य संवाद आणि पुरेशी जागा देणे याकरिता महत्त्वाचा आहे.

यासाठी जी काही मोकळीक आहे जी देणे आवश्यक आहे, हे मात्र यात दोघांनीही समजून घेणे आवश्यक आहे. एकमेकांशी बोला, चर्चा करा. मात्र स्वत:च्या गोष्टीसाठी दुसऱ्यावर जबरदस्ती करू नका. एकमेकांच्या दिवसाबद्दल गोष्टी सामायिक केल्याने दुरूनही महत्त्वपूर्ण नातेसंबंध टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.

३. संतुजित लित व्हा : – तुमचे अवलंबित्व आणि स्वातंत्र्य संतुलित असल्याची खात्री करा. तुमच्या जोडीदाराला तुम्हाला त्याची/तिची किती गरज आहे याची खात्री करा, पण त्याला किंवा तिला चिकटून राहू नका. कारण त्यामुळे तुमच्या जोडीदाराला अडकल्यासारखे वाटू शकते.

४. विविध पद्धतीमध्ये तंत्रज्ञान वापरणे : – व्हिडिओ कॉल, ई-मेल लिहिणे, पत्रांद्रारे आश्चर्यचकित करणे, ऑनलाइन भेटवस्तू देणे हा नातेसंबंधात उत्साह टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रेम व्यक्‍त करण्याचा चांगला मार्ग आहे.

५. कौतुक करा : – जेव्हा समोरचा तुमचे योग्यरित्या ऐकेल, तेव्हा त्याचे त्वरित कौतुक करा आणि जेव्हा समोरचा बोलत असेल तेव्हा त्यामध्ये स्वारस्य दाखवा. आपण या बाबी सामायिक करून त्यांच्याशी संपर्कात राहणे आवश्यक आहे.

६. एकत्र कार्यक्रम करणे : – जेव्हा लोक नातेसंबंधात असतात तेव्हा एकत्र गोष्टी सांगण्याची किंवा अनुभवण्याची गरज असते, परंतु लांबच्या नातेसंबंधात ते कठीण होते. तथापि, एकाच वेळी चित्रपट पाहणे, एकत्रितपणे स्वयंपाक करणे किंवा एखाद्याचा दिवस प्रत्यक्षात शोधणे यासारख्या काही क्रिया एकत्र केल्याने जोडप्याला नातेसंबंध सुधारण्यास मदत होऊ शकते. तसेच एकत्र सुट्टीसाठी वेळ काढा.

७. विश्वास ठेवणे : – सर्व नाती ही मजबूत पायांवर अवलंबून असतात. त्यामुळे हा पाया भक्‍कम असण्यासाठी विश्‍वास ठेवा. जरी शारीरिक अंतर असले तरी, संलग्न आणि भावनिकसंबंध यामुळे प्रभावीपणे टिकवता येतात. नातेसंबंध टिकवण्यासाठी आणि भरभराटीसाठी जोडीदारावर विश्‍वास ठेवणे हा एक महत्त्वाचा पैलू बनतो.

एकमेकांना आभासी आणि वैयक्तिक जागा देणे, एकमेकांचा आदर करणे आणि बदल स्वीकारणे तसेच सर्व समस्या आणि चिंतांना शारीरिक अंतराशी जोडणे टाळणे महत्त्वाचे आहे. नात्यामध्ये घनिष्ठता येणे गरजेचे असते, परंतु दोघांतले अंतर ही घनिष्ठता येण्यापासून प्रतिबंधित करते.

जेव्हा दोन लोक वेगवेगळे असतात, तेव्हा एकमेकांना आदर्श बनवणे आणि एकमेकांना रोमँटिक करणे खूप सोपे असते. ही एक चांगली भावना आहे परंतु कधीकधी ती भ्रामक असू शकते. सांसारिक, तरीही महत्त्वाचे फरक दुर्लक्ष करणे आणि आपल्या अंतःकरणाच्या कंटाळवाण्या सत्यांऐवजी आपल्या मनाच्या नाटकात अडकणे हे खूप सोपे आहे.

नातेसंबंधात हे पैलू समजून घेण्यासाठी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. नातेसंबंध गुंतागुंतीचे आणि कठीण असू शकतात, परंतु जर सुज्ञपणे हाताळले गेल्यास ते निरोगी, आनंदी जीवन टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे ठरतात.

Ahmednagarlive24 Office