म्युकरमायकोसिस रुग्णांचे नातेवाईक आर्थिक अडचणीत ! शासनाकडून …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- जगभरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने कहर केले आहे. याला आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोविड सेंटरची उभारणी केली.

तसेच नगरपालिका, महानगरपालिका, सामाजिक संस्था, लोकवर्गणी, खाजगी दवाखाने यांच्या माध्यमातून अनेक कोविंड सेंटरची उभारणी करून यशस्वी उपचार केले. यात काहींचा उपचारादरम्यान मुत्यु झाला.

आता त्या पाठोपाठ आलेला म्युकरमायकोसिस रोगाने थैमान घातले आहे. आता या आजारावरील आर्थिक खर्च सर्वसामान्यांना न परवडणारा झाला असल्याचे दिसून येत आहे. म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांनादोन ते तीन महिन्यापर्यंत गोळ्या चालू ठेवाव्या लागतात.

दवाखान्याचा व या तीन महिन्यांपर्यंत येणारा खर्च सुमारे 18 ते 20 लाखांपर्यंत जातो. या उपचारासाठी लागणारा खर्च नाकापेक्षा मोती जड असा आहे.

त्यामुळे म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना राज्य शासनाने अर्थिक मदत करावी अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे. प्रत्यक्षात रुग्ण बरा होईपर्यत 18 ते 20 लाखांपर्यंत खर्च येतो. हा खर्च बहुतांश रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहे.

म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णांना दोन ते तीन महिन्यापर्यंत गोळ्या चालू ठेवाव्या लागतात. हा तीन महिन्यापर्यंत खर्च 1 ते 2 लाखांपर्यंत येतो. आता या रुग्णांना राज्य शासनाने अर्थिक मदत करावी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24