नोकरीच्या आमिषाने देहविक्रीत ढकललेल्या महिलेची सुटका !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :-  कोरोनाच्या संकटामुळे अनेक ठिकाणी हाताला काम नाही, अशातच जास्त वेतनाच्या नोकरीच्या आशेपोटी भारतात चोरमार्गाने आलेल्या एका बांगलादेशी महिलेस देहविक्रय करण्यास भाग पाडण्यात येत असल्याची घटना उघडकीस आली आहे.

नागपाडा पोलिसांनी यातील पीडित महिलेची सुटका केली असून, पुढील तपास सुरू आहे.बांगलादेश-पश्चिम बंगाल सीमेवरील गावात राहणारी एक महिला एका तागाच्या गिरणीत नोकरीला होती. लॉकडाऊ नमुळे गेल्या वर्षी तिची नोकरी गेली.

नवीन नोकरीच्या शोधात असताना एका महिलेने तिला भारतामध्ये ब्युटिपार्लरमध्ये नोकरी मिळत असून चांगले वेतनही मिळेल, असे सांगितले. सुरुवातीला नकार देणारी ती महिला कुटुंबाची उपासमार पाहून भारतात येण्यास तयार झाली.

त्या महिलेने ओळख करून दिलेल्या परिचयातील व्यक्तींसोबत ती होडीतून नदी पार करून कोलकाता येथे आली. तेथून तिला मुंबईत आणण्यात आले आणि मुंबईहून हैदराबाद येथे नेण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24