अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगाव येथील किराणा व भुसार मालाचे व्यापारी रमेश मुथा व गणेश ऊर्फ मुन्ना मुथ्था व आशा मुथा यांनी गोदावरी नदीकाठच्या परिसरातील हजारो शेतकऱ्यांचे भुसार खरेदीचे मोठी आर्थिक फसवणूक केली होती.
दरम्यान पोलिसांनी यांना अटक केली होती. मात्र आता या तिघांना जिल्हा न्यायालयाने जामीनावर मुक्त केले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अनेक शेतकऱ्यांच्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकारासह अन्य काही प्रकरणामध्ये या तिघा आरोपींविरुद्ध तक्रार दाखल होत्या, त्यानुसार त्यांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान सदर प्रकरणामधे दोषारोपपत्र दाखल झाले असून तपास पूर्ण झाले असल्याने व धनादेश आणि रक्कम वसुलीबाबत वेगळी कार्यवाही सुरु झाली आहे.
म्हणून सदर प्रकरणात मुथा यांना जमीन मंजूर करावा, असा युक्तिवाद मुथा यांच्या वाक़िलातर्फे करण्यात आला. तर सदर गुन्हा गंभीर स्वरूपचा असून आणि शेतकर्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून त्यांचा जमीन अर्ज नामंजूर करावा, असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आला.
दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने मुथा यांचा जमीन अर्ज मंजूर करुन त्यांना जमीनावर मुक्त केले आहे. आरोपींच्यावतीने अॅड़. आर. पी. सेलोत, अॅड़. मयुर गांधी, अॅड़. पंकज म्हस्के यांनी काम पहिले.