Reliance Jio : रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी बरेच रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनीच्या प्रत्येक रिचार्ज प्लॅनची वैधता वेगवेगळी असते. काही रिचार्ज प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा देण्यात येतो तर काही रिचार्ज प्लॅनमध्ये 2 जीबी डेटा तर काही प्लॅनमध्ये 1 जीबी डेटा देण्यात येतो.
कंपनीचे काही रिचार्ज प्लॅन ग्राहकांच्या बजेटमध्ये येतात. ज्याची किंमत फक्त 119 रुपयांपासून सुरु होते. इतकेच नाही तर कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउड आणि जिओ सिनेमा सारख्या इतर जिओ अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे.
कंपनीचा 119 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओच्या 119 रुपयांच्या प्लॅनची वैधता एकूण 14 दिवसांची आहे. यात तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगचा लाभ मिळेल. याचाच अर्थ असा की तुम्ही 14 दिवस हवे तितके बोलू शकता. यामध्ये तुम्हाला 14 दिवसांसाठी 1.5 GB डेटा देण्यात येईल. तसेच यात जिओ क्लाउड,जिओ सिक्युरिटी आणि जिओ सिनेमा सारख्या इतर जिओ अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन देण्यात येत आहे.
कंपनीचा 149 रुपयांचा प्लॅन
रिलायन्स जिओ या रिचार्ज प्लॅनची 20 दिवसांची वैधता आहे. 149 रुपये किमतीच्या प्लॅनमध्ये दिवसाला 1GB डेटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. सोबत, जिओ सिक्युरिटी, जिओ क्लाउड आणि जिओ सिनेमा सारख्या इतर जिओ अॅप्सचे मोफत सब्सक्रिप्शन दिले जात आहे.
कंपनीचा 155 रुपयांचा रिचार्ज प्लॅन
रिलायन्स जिओच्या 155 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता मिळत आहे. यात अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. यामध्ये तुम्हाला 28 दिवसांसाठी 2 GB डेटा दिला जात आहे. जर डेटा संपला की इंटरनेटचा स्पीड नक्कीच कमी करण्यात येईल. परंतु लोकल आणि एसटीडी कॉल्स सुरू असणार आहेत.