Reliance Jio : देशातील सर्वात लोकप्रिय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन ऑफर करत असते. कंपनीचे पोस्टपेड तसेच प्रीपेड रिचार्ज प्लॅन ग्राहकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत.
कंपनीने सध्या असेच काही प्रीपेड प्लॅन आणले आहेत ज्याची किंमत खूपच कमी आहे. इतकेच नाही तर ग्राहकांना या प्लॅनमध्ये दररोज 2.5GB डेटा, 75GB पर्यंत बोनस डेटा दिला जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्लॅनमध्ये 23 दिवसांची अतिरिक्त वैधता मोफत मिळत आहे.
कंपनीचा 2999 रुपयांचा प्लॅन
तुम्हाला रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये दररोज 2.5 जीबी डेटा मिळणार आहे. कंपनीकडून या प्लॅनमध्ये कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 75 GB बोनस डेटा देण्यात येत आहे. या प्लॅनची वैधता 365 दिवसांची असून कंपनी या प्लॅनसह 23 दिवसांची जास्त वैधता देत आहे. कंपनीच्या या प्लॅनमध्ये दररोज 100 फ्री एसएमएसही दिले जात आहे. कंपनीच्या वापरकर्त्यांना Jio अॅप्सचे विनामूल्य सदस्यता मिळणार आहे.
कंपनीचा 2023 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये तुम्हाला 252 दिवसांची वैधता मिळणार असून यात दररोज 2.5 जीबी डेटा दिला जात आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग तसेच दररोज 100 मोफत एसएमएस मिळतात. कंपनीच्या या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Cloud आणि Jio Security सारख्या अॅप्सवर मोफत प्रवेश देण्यात येत आहे.
कंपनीचा 899 रुपयांचा प्लॅन
यात तुम्हाला दररोज 2.5 जीबी डेटा दिला जाईल तसेच यात व्हॉईस कॉलिंग आणि 100 मोफत एसएमएस मिळतील. हा प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात तुम्हाला Jio अॅप्सचा मोफत प्रवेश दिला जाईल.
कंपनीचा 349 रुपयांचा प्लॅन
हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसह येत असून यात तुम्हाला दररोज 2.5 जीबी डेटा देण्यात येईल. तसेच या प्लॅनमध्ये, देशभरातील सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग दिला जात आहे. तसेच या प्लॅनमध्ये दररोज 100 मोफत एसएमएसही मिळत असून या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud वर मोफत प्रवेश मिळेल.