Reliance Jio Recharge Plan : फक्त एकदाच करा रिचार्ज अन् वर्षभर 2GB डेटासह मिळवा अनेक फायदे! जाणून घ्या किंमत..

Pragati
Published:

Reliance Jio Recharge Plan : आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या नवनवीन ऑफर आणत असतात. असाच एक प्लॅन देशातील सर्वात आघाडीची रिलायन्स जिओ कंपनी आणला आहे.

कंपनीकडे पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्ज प्लॅन असतात. हा कंपनीचा 2,879 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन आहे. यात ग्राहकांना दररोज 2GB डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉल मिळतात. इतकेच नाही तर यात ग्राहकानं JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळत आहे. काय आहे प्लॅन? जाणून घ्या.

कंपनीचा 2,879 रुपयांचा रिचार्ज

कंपनीच्या प्रीपेड प्लॅनची किंमत 2,879 रुपये आहे आणि ​​वैधता 365 दिवसांची आहे. म्हणजेच आता तुम्ही एकदा रिचार्ज केला तर ग्राहकांना 1 वर्षासाठी रिचार्जची झंझट राहणार नाही. कंपनीच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला 2 जीबी डेटा मिळत आहे. त्यामुळे या प्लॅनमध्ये एकूण 730 जीबी डेटाचा फायदा मिळतो. दैनंदिन डेटा मर्यादा संपली की इंटरनेटचा वेग 64Kbps इतका कमी होतो.

कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल उपलब्ध असून या रिचार्ज प्लॅनद्वारे ग्राहकांना देशभरात स्थानिक आणि एसटीडी व्हॉईस कॉल करता येतात. तसेच या पॅकमध्ये दररोज 100 एसएमएस मिळतात.

कंपनीच्या या प्लॅनमध्ये JioTV, JioCinema, JioSecurity, JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन ग्राहकांना मिळत आहे. 5G डेटा चालवणारे ग्राहक या प्लॅनमध्ये अनलिमिटेड 5G इंटरनेट वापरू शकतात.

तसेच, कंपनीकडे 2,999 रुपयांचा प्रीपेड प्लॅन असून जो 365 दिवसांच्या वैधतेसह येतो तसेच तो दररोज 2.5 GB डेटा ऑफर करत आहे. तर 2,545 रुपयांच्या प्लॅनची ​​वैधता 336 दिवसांची असून त्यात दररोज 1.5 GB डेटा मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe