अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :- कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर औषधासाठी रुग्णांचे नातेवाईकांचे हाल होत आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची होणारी वणवण पाहून सरकारने रेमडेसिवीरचं उत्पादन दुप्पट करण्याची परवानगी दिली.
तसेच सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ट्विटवर ही माहिती दिली.
डिसेंबर २०२० मध्ये करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर रेमडेसिवीर तयार करण्याऱ्या कंपन्यांनी उत्पादन घटवलं होतं. त्यात करोनाची दुसरी लाट आल्याने रेमडेसिवीरची मागणी वाढली.
त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
तसेच रेमडेसिवीरची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने त्याच्या निर्यातीवर रविवारी बंदी घातली.
कंपन्यांचे नवे दर कसे असतील :-