पेट्रोलियम कंपन्यांकडून दिलासा, पेट्रोल डिझेलचे दर झाले कमी…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल करत असतात. मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी होळीच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली.

30 मार्च 2021 रोजी पेट्रोलच्या किंमतीत 22 पैसे आणि डिझेलच्या किंमतीत 23 पैसे कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते.

परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे (कच्चे तेल) दर काय आहेत यावर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले तर तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे 7 रुपयांनी पेट्रोल महाग झाले आहे.

त्याचप्रमाणे डिझेलही प्रति लिटर 7.60 रुपयांनी महाग झाले आहे. या कपातीनंतर मुंबईतील पेट्रोलची किंमत 96.98 रुपये आणि डिझेलची किंमत प्रतिलिटर 87.96 रुपये झाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24