रेमडेसिवीर काळाबाजार पडला महागात ! पहा काय झाले त्यांच्यासोबत…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- रेमडेसिवर इंजेक्शनचा तुटवडा असताना त्याचा काळाबाजार करून ज्यादा दराने विक्री करणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी (दि.९) रात्री सांगवीत ही कारवाई केली. त्यांनी प्रति इंजेक्शन ११ हजार रुपयांना विक्री करत असल्याची बाब समोर आली असून त्यांच्याकडून इंजेक्शनसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

आदित्य दीपक मेंदर्गी (२४, रा. पिंपरी), अजय गुरुदेव मोराळे (२७, रा. सांगवी) आणि मुरलीधर सुभाष मारुटकर (२४, रा. बाणेर) , प्रताप सुनील जाधवर (२४ रा.तळेगाव दाभाडे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मारुटकर हा बाणेर कोविड सेंटरमधील ब्रदर आहे. या प्रकरणी औषध निरीक्षक भाग्यश्री यादव यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवीतील काटे पुरम चौकात रेमडेसिवर या इंजक्शनची विक्री करण्यासाठी तरुण येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एकाला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे कसून चौकशी करुन त्याच्या इतर तीन साथीदारांना ताब्यात घेतले. तपासात बाणेर येथील कोविड सेंटर मधून अवैधरित्या हे रेमडेसीवरची ३ इंजक्शन आणण्यात आले होते.

इंजेक्शनपेक्षा छापील किंमतीपेक्षा ११ हजार रुपये किमतीला ते विक्री करत होते.रेमडेसिवर इंजक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.

त्यांच्याकडून १५ हजार रुपये किंमतीची ३ रेमडेसिवर इंजक्शन आणि इतर ऐवज असा १ लाख ७४ हजार ४०० रुपयांचा ऐवज जप्त केला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24