अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :- राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वाढीव रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज रहावे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता ज्यांना गरज आहे, त्यांनाच इंजेक्शन द्यावे, असे निर्देश ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोपरगाव कृष्णाई मंगल कार्यालय येथील आढावा बैठकीत दिले.
एसएससीएम कोविड सेंटर व महात्मा गांधी प्रदर्शन येथील ३०० बेड कोविड सेंटरला भेट दिली व पाहणी केली. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी (१७) सकाळी कोपरगाव तालुक्याचा दौरा केला.
सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक डॉ. मनोज पाटील, खासदार सदाशिव लोखंडे,
माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पोखरणा, प्रांताधिकरी गोविंद शिंदे, पोलिस उपअधीक्षक संजय सातव, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,
वासुदेव देसले, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी, डॉ. वैशाली बडदे, सर्व यंत्रणांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.
कोपरगाव : राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वाढीव रूग्ण संख्येच्या प्रमाणात सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज रहावे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेता ज्यांना गरज आहे,
त्यांनाच इंजेक्शन द्यावे, असे निर्देश ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोपरगाव कृष्णाई मंगल कार्यालय येथील आढावा बैठकीत दिले.
एसएससीएम कोविड सेंटर व महात्मा गांधी प्रदर्शन येथील ३०० बेड कोविड सेंटरला भेट दिली व पाहणी केली. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी (१७) सकाळी कोपरगाव तालुक्याचा दौरा केला.
सर्व यंत्रणांचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलिस अधीक्षक डॉ. मनोज पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे,
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पोखरणा, प्रांताधिकरी गोविंद शिंदे, पोलिस उपअधीक्षक संजय सातव, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, वासुदेव देसले,
ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, नायब तहसीलदार मनिषा कुलकर्णी, डॉ. वैशाली बडदे, सर्व यंत्रणांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी यांची उपस्थिती होती.