‘रेमडेसिवीर’इंजेक्शनावरुन नगरमध्ये वातावरण तापले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी  विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणला खरा, परंतु आता यावरुन जिल्ह्यात चांगलेच वातावरण तापले आहे.

काही सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. विखे यांनी विनापरवाना रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याचा दावा करत याविरोधात हायकोर्टात दाद मागितली आहे.

सोमवारी सुनावणी झाली असता, न्या. आर. व्ही. घुगे आणि न्या. बी. यु. देबडवार यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाला  योग्य ती कायेदशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे डॉ. विखे यांना कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.  याविषयीची माहिती अॅड. अजिंक्य काळे यांनी दिली.

सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली आहे.

खा. विखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा तत्काळ शासनाने जप्त करावा

व  गरजू रुग्णांना जिल्हाधिका-यांमार्फत समन्याय पद्धतीने वाटप करावी अशी विनंती  याचिकेत करण्यात आली आहे. याचिकेवर २९ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24