अहमदनगर मध्ये रेमडीसिवीरचा काळाबाजार सुरूच !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 मे 2021 :- नगर शहरात रेमडीसिवीरचा काळाबाजार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आणखी तिघांचे रॅकेट पोलिसांनी उघड केले.

त्यापैकी एकाला अटक केली. त्याच्याकडून तीन इंजेक्शनसह सात लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

तारडे हॉस्पिटल (बालिकाश्रमरोड) व काकासाहेब म्हस्के मेडिकल कॉलेज कमान ( एमआयडीसी) परिसरात काही व्यक्ती रेमडेसिवीरची चढ्या दराने विक्री करत आहेत,

अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार कटके यांनी पथकाला सूचना दिल्या.

पथकाने रेमडेसिवीरची विक्री करणाऱ्या व्यक्तीचा मिळालेला मोबाइल क्रमांकावर संपर्क करून रेमडेसिवीरबाबत विचारपूस केली.

त्यावर त्या व्यक्तीने एका इंजेक्शनची किंमत २७ हजार रुपये सांगितली. त्यावेळी या व्यक्तीने खरेदीसाठी होकार दिला असता, या व्यक्तीने तारडे हॉस्पिटल परिसरात येण्यास सांगितले.

पोलिसांनी सापळा लावून हेमंत दत्तात्रय कोहोक पोळके (२१ रा. सनफार्मा स्कूल जवळ बोल्हेगाव, नगर) यास ताब्यात घेतले.

त्याने हे इंजेक्शन महेश दशरथ मते (रा. बरबडेवस्ती तपोवनरोड, नगर) व प्रदीप मारुती मगर व अमर शिंदे (दोघे रा. तागडवस्ती तपोवनरोड, नगर) या तिघांनी मिळून दिल्याचे सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24