Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Renault SUV : सोडू नका अशी संधी! ‘या’ शक्तिशाली SUV वर मिळत आहे 60,000 रुपयांपेक्षा जास्त सवलत, त्वरित खरेदी करा

Renault SUV : सध्या भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात SUV ची खरेदी केली जात आहे. त्यामुळे अनेक कंपन्या शक्तिशाली फीचर्ससह SUV लाँच करत आहेत. परंतु कंपन्यांनी त्यांच्या कारच्या किमतीत वाढ केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

त्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे खर्च करून या कार खरेदी कराव्या लागत आहेत. मात्र जर तुम्ही नवीन कार खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक संधी आहे. कारण आता तुम्ही 60,000 रुपयांपेक्षा जास्त सवलतीत Renault च्या SUV खरेदी करू शकता. दरम्यान ही संधी काही दिवसांसाठीच असणार आहे.

तुम्ही आता स्वस्तात रेनॉल्ट क्विड, रेनॉल्ट किगर आणि रेनॉल्ट ट्रायबरच्या या तीन SUV खरेदी करू शकता. जाणून घेऊयात या तीन SUV वर उपलब्ध असणाऱ्या ऑफर्सबद्दल.

  • रेनॉल्ट क्विड

तुम्हाला या हॅचबॅकच्या BS-6 फेज-1 आणि BS-6 फेज-2 मॉडेल्सवर 57,000 रुपयांपर्यंतच्या सवलती मिळत आहेत. BS-6 फेज-2 मॉडेल्स 27,000 रुपयांपर्यंतच्या सूटसह विक्री केली जात आहेत. यात एकूण 5,000 रुपयापर्यंत रोख सवलत, 10,000 रुपयापर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 12,000 रुपयापर्यंत कॉर्पोरेट सवलतीचा समावेश आहे. तसेच ग्रामीण भागात राहत असणाऱ्यांना 5,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलतीचा लाभ मिळणार आहे.

तसेच, Renault Kwid चे BS6 फेज-1 मॉडेल्स ₹57,000 रुपयांपर्यंतच्या सवलतींसह25,000 च्या रोख सवलती, 20,000 पर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 12,000 कॉर्पोरेट डिस्काउंटसह विकले जात आहे. इतकेच नाही तर 5,000 रुपयांपर्यंतचा ग्रामीण लाभ मिळत आहे.

  • रेनॉल्ट किगर

रेनॉल्ट किगरचे BS6 फेज-1 आणि BS6 फेज-2 मॉडेल्स अनुक्रमे 62,000 आणि 52,000 रुपयांपर्यंतच्या फायद्यांसह तुम्ही खरेदी करू शकता. या सवलतींमध्ये एकूण 25,000 पर्यंतचे रोख फायदे, 25,000 पर्यंतच्या एक्सचेंज ऑफर तसेच 12,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायद्यांचा समावेश असणार आहे. तसेच, ही कारदेखील 5,000 रुपयांपर्यंतच्या ग्रामीण लाभांसह खरेदी करता येत आहे.

  • रेनॉल्ट ट्रायबर

रेनॉल्ट ट्रायबर चे BS-6 फेज-1 आणि BS-6 फेज 2 हे दोन्ही मॉडेल कमीत कमी 52,000 रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. ही ऑफर ₹15,000 पर्यंतचे रोख लाभ,12,000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत आणि 25,000 रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह येत आहे.