Ahmednagarlive24 Marathi News
Marathi Breaking News, Marathi Live Batmya, मराठी बातम्या

Renault Upcoming SUV : ह्युंदाईला फुटणार घाम! लवकरच लाँच होणार Renault ची नवीन SUV, जाणून घ्या किंमत

जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचार असाल तर जरा थांबा कारण मार्केटमध्ये लवकरच नवीन Renault SUV लाँच होणार आहे.

Renault Upcoming SUV : सध्या अनेकजण आपल्या स्वप्नातली कार खरेदी करत आहेत. जर तुम्हीही नवीन कार विकत घेण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच भारतीय बाजारात Renault ची शक्तिशाली फीचर्स असणारी नवीन SUV लाँच होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

यात कंपनीकडून जबरदस्त पॉवरट्रेन देण्यात येत आहे. कंपनीची आगामी कार मार्केटमध्ये असणाऱ्या Hyundai Creta ला कडवी टक्कर देताना पाहायला मिळेल. जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर कंपनीची आगामी कार तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

कशी आहे पॉवरट्रेन?

ही कंपनी नवीन रेनॉल्ट डस्टरमध्ये जबरदस्त पॉवरट्रेन देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात 1.3 लीटर हायब्रिड इंजिनचा पर्याय देण्यात येईल. इतकेच नाही तर या कारचे भारतीय मॉडेल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह जोडण्यात येईल अशी शक्यता सध्या वर्तविली जात आहे. कंपनी आगामी कारमध्ये नवीन 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देऊ शकते.

किती आहे रेनॉल्ट डस्टरची किंमत?

कंपनीकडून आतापर्यंत या कारच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. परंतु असे मानले जात आहे की कंपनी ही आपली आगामी कार बाजारात 12 ते 16 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही आलिशान SUV खरेदी करण्याच्या विचारात असल्यास तुमच्यासाठी Renault ची आगामी नवीन कार फायदेशीर ठरेल. त्याशिवाय या कारचा लूकही अतिशय स्टायलिश असेल.