अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:-नगर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज मार्चअखेर भरून कारखानदारांना दाखवून द्या की आम्ही प्रामाणिक आहोत.
कारखानदार शेतकऱ्यांची वसूली करण्यासाठी नियम लावतात. तेच नियम कारखानदारांना यापुढे लावले जातील. असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले आहे.
शेतकऱ्याला आर्थिक मदत व्हावी व शेतीव्यवसायासाठी लागणारी आर्थिक मदत देण्याचे काम मागील जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाने घेतल्यामुळे सर्वात जास्त 129 कोटी रूपयाचा लाभ नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले.
कर्ज वसूली होणे गरजेचे असून शेतकऱ्यांनी खरीप व रब्बी पिकासाठी शुन्य टक्के व पशुपालन खेळते भाडवंलाचे कर्ज भरून केंद्र सरकारचे 3 टक्के अनुदान मिळावे,
असे मत माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी सचिव व शाखाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले. कर्डिलेंच्या विरोधकांवर टीकास्त्र मी कधीही बेकायदेशीर काम करीत नाही.
जे काही काम करतो ते नियमात करतो. त्यामुळे मला यांना घाबरण्याची गरज नाही. बँकेत बेकायदेशीर वाटलेले कर्ज यांच्या कारखान्याकडे आहे.
बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनाच लाभ होईल, यासाठी संघर्ष करीत राहील, असे मत माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले.