अहमदनगर जिल्ह्यात घडली पहाटेच्या शपथविधीची पुनरावृत्ती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:-मागील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून राज्यात मोठे राजकीय नाट्य रंगले होते.

किंबहुना राज्यात कोणाची सत्ता येणार आणि कोणाचा मुख्यमंत्री विराजमान होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. यादरम्यान पक्षात फाटाफूट होऊन रातोरात गठबंधन होऊन सत्ता स्थापन झाली होती.

यावेळी पहाटेचा शपथविधी चांगलाच रंगला होता. आता याचितोच पुनरावृत्ती नगर जिल्ह्यात झाली आहे. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यात लोणी हवेली येथे सरपंचपदाच्या निवडणुकीत असा किस्सा पुन्हा घडला.

पारनेर तालुक्यातील लोणी हवेली गावात बिनविरोध निवडणुका व्हाव्यात यासाठी आमदार निलेश लंके यांनी आवाहन केले होते, परंतु भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, शत्रुघ्न नवघणे यांनी याला विरोध केला.

त्यानंतर निवडणुकीत राष्ट्रवादीचे अशोक दुधाडे, जान्हवी बाजीराव कोल्हे, शिवाजी थोरे, सीमा कोल्हे, अमोल दुधाडे असे पाच जण निवडून आले. तर भाजपचे शत्रुघ्न नवघणे, संजीवनी दुधाडे यांच्यासह अन्य दोन असे चार सदस्य निवडून आले.

ग्रामपंचायतीत ५ आणि ४ असं बलाबल झालं. सरपंचपदासाठी भाजपाने राष्ट्रवादीचा सदस्य रातोरात फोडला आणि त्याला उपसरपंचपद देऊ केले.

या सदस्याला सोबत घेऊन भाजपाने महादेव मंदिरात मध्यरात्रीच शपथविधी सोहळा उरकून घेतला.इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या त्या सदस्याला पाच वर्ष एकत्र राहण्याचे सांगून महादेवाच्या पिडींवर हात ठेवून शपथ घेण्यास सांगितली.

सकाळी या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गावात खळबळ माजली.राष्ट्रवादीच्या नेत्यांना ही माहिती समजताना त्यांनी थेट बंडखोर सदस्याचे घर गाठले आणि त्याची समजूत काढून पुन्हा राष्ट्रवादीत घरवापसी केली

त्यामुळे काही तासांसाठी सरपंचपद भाजपाला मिळाले. त्यानंतर पुन्हा गावात सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक झाली. यात ५-४ च्या मताधिक्याने राष्ट्रवादीच्या जान्हवी दुधाडे या सरपंचपदी,

तर उपसरपंचपदी अमोल दुधाडे निवडून आले. रात्रीच शपथ घेतलेल्या भाजपच्या संजीवनी दुधाडे, शत्रुघ्न नवघणे यांना पराभव पत्करावा लागला.

अहमदनगर लाईव्ह 24