आरक्षणप्रश्नी महाविकास आघाडीचा बुरखा फाटला आहे !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जून 2021 :- महाविकास आघाडी सरकार स्वतःला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागासवर्गीयांच्या आरक्षण प्रश्नी महाविकास आघाडीचा बुरखा फाटला आहे.

महाविकास आघाडी सरकार हे दलित विरोधी सरकार असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला.

राज्य सरकारने पदोन्नती आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन निदर्शन करण्यात आली. पदोन्नतीत आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारला घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार ने त्वरित घेण्याची प्रमुख मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.

या आंदोलनात आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, आयटी सेलचे संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, विवेक भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, दया गजभिये, सचिन धीवर, विलास साळवे, जय दाभाडे, विक्रम चव्हाण, कृपाल भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे आदी सहभागी झाले होते.

अहमदनगर लाईव्ह 24