अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाहू लागला आहे . तसेच वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच अनेकांचे प्राण देखील यामुळे जात असल्याचे दिसून येत आहे.
यातच जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे कामगार संघटनेने खासदार सुजय विखे यांच्याकडे एक विशेष मागणी केली आहे.
खासदार डॉ. सुजय विखे यांनी अहमदनगरसाठी आणलेल्या ३०० रेमडेसिविरमधून ५० इंजेक्शन्स महापालिका कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याची
मागणी कामगार संघटना महासंघाचे कॉ. भैरवनाथ वाकळे व डॉ. मेहबूब सय्यद यांनी महापालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कामगार संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महानगरपालिकेचे दोन कर्मचारी कोरोनामुळे गंभीर आहेत. कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत.
या कर्मचाऱ्यांना इंजेक्शन मिळू शकत नाही, ही बाब निषेधार्ह आहे. खासदार डॉ. सुजय विखे यांनी थेट दिल्लीवरून ३०० इंजेक्शन्स आणलेले आहेत. त्यापैकी ५० इंजेक्शन्स आपल्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवावे.
याबाबतचे पत्र आयुक्तांनी खासदार विखेंना द्यावे, अशी मागणी कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.