नाशिक, घोटी इगतपुरी व धरण परिसरात पावसाने विश्रांती घेतली. सध्या सुरू असलेल्या पावसाला फारसा जोर नाही. त्यामुळे दारणा, भावली व कडवा धरणातून गोदावरी नदीत २१ हजार ९७२ क्युसेक्स वेगाने पाणी सोडले आहे. दारणा धरणात ८३.४४ टक्के पाणीसाठा झाला तर भाम, भावली धरणे पुर्णपणे भरले आहे. कडवा धरणही भरण्याच्या मार्गावर आहे.
२६ जुलै रोजी झालेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे मिली मिटरमध्ये तर कंसातील आकडे एकुण पावसाचे आहेत. दारणा १० (५३६), मुकणे ११ (६२७), वाकी २२ (१०१९), भाम ५७ (१४७६), भावली १८ (१९३६), वालदेवी ० (४११), गंगापूर ११ (६३१), काश्यपी ३ (५८३), गौतमी ६ (६३२), कडवा ४ (३११), आळंदी ५ (३७५), पालखेड ० (१४७), करंजवण ० (४५०), वाघाड ६ (३३०),
नांदूर मध्यमेश्वर ० (१५२), नाशिक ० (३७६), घोटी ३१ (८५३), इगतपूरी ३६ (१२४४), त्र्यंबकेश्वर १२ (९६३), देवगाव ० (२५५), ब्राम्हणगाव ० (२८१), कोपरगाव ० (२१५), पढेगाव ० (२५), सोमठाणे (२०९), कोळगाव ० (२४०), सोनेवाडी ० (१६२), शिर्डी० (२३४), राहाता ० (१७३), रांजणगाव खुर्द ० (२१४), चितळी ० (१९९), याप्रमाणे पाऊस झाला आहे.
धरणातील पाणीसाठा टक्के, तर कंसातील आकडे उपलब्ध पाणी दशलक्ष घनफुटमध्ये पुढीलप्रमाणे दारणा ८३ ३२ टक्के (२३२३) वाकी ४० टक्के (९९८), भाम १०० टक्के (२४६४), भावली १०० टक्के, (१४३४), वालदेवी ६२ टक्के (११३३), गंगापूर ५६ टक्के (३२०२), काश्यपी २८ टक्के (५३१), गौतमी ५४ टक्के (१०२५), कडवा ९१ टक्के (१५५१), आळंदी २१टक्के (१७२), पालखेड ३६ टक्के (२३९), करंजवण १८ टक्के, (९८०), असा पाणीसाठा आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी गोदावरी कालव्यांना पाण्याचे आर्वतन सोडण्यात आले आहे. २००५ च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यान्वये सद्या गोदावरी नदीला पाणी सोडण्यात आले आहे. यंदा पर्जन्यमान उशीराने होत असल्याने बहुतांष धरणे अद्यापही भरली नाहीत.