पारनेरसह ‘त्या’ ११ गावात निर्बंध अधिक कठोर ! व्यवहार आठ दिवस बंद?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10  जुलै 2021 :- कोरोनाचा वेगाने फैलाव होत असलेल्या पारनेर तालुक्यातील अकरा गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक गावासाठी स्वतंत्र पालक अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

त्याचबरोबर या गावांमध्ये आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी,पोलीस, शिक्षकांचा समावेश असणारी पथके नियुक्त केल्याची माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.

पारनेरमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण इतर तालुक्यांपेक्षा अधिक आहे. निघोज व परिसरात रुग्णालये व रुग्णालयांशी संबंधित औषधांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, व्यवहार आठ दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिले.

कोरोना संसर्गाचा वेगाने फैलाव होणाऱ्या गावांमध्ये पारनेर शहरासह निघोज, पठारवाडी, पिंपरी जलसेन, पिंपळगाव रोठा,भाळवणी,जवळे, कर्जुले हर्या, लोणीमावळा, वनकुटे, जामगाव या गावांचा समावेश आहे.

या गावांमधील १०० टक्के कुटुंबांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. गंभीर रुग्णांना पारनेर ग्रामीण रुग्णालयातील कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येणार असून इतर

ठिकाणांहून गावात येणाऱ्या व्यक्तींना गावातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अथवा माध्यमिक विद्यालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24