अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नेप्ती उपबाजार समितीमध्ये कांदा लिलाव, फळे आणि भाजीपाला, तसेच मुख्य बाजार समितीतील भुसार बाजार सकाळी ७ ते ११ या वेळात सुरू करण्यात आला असल्याची माहिती सभापती अभिलाष घिगे यांनी दिली.
एका गाडीबरोबर एकाच शेतकऱ्याला येता येईल. गेटवर कोविड चाचणी करुनच आत प्रवेश दिला जाईल. विनामास्क व कोविड नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
दरम्यान, भुसार बाजारात अन्नधान्याची ३९४ क्विंटल आवक झाली. नेप्ती येथे गेल्या दोन दिवसांत फळे, भाजीपाल्याची ५९२ क्विंटल आवक झाली.
कांद्याची आवक १०८६८ क्विंटल झाली. एक नंबर कांद्यास १८०० ते २१०० रुपये, दोन नंबर कांद्यास १०५० ते १८०० रुपये, तीन नंबर कांद्यास ६०० ते १०५० रुपये, चार नंबर कांद्यास ३०० ते ६०० रुपये असा दर मिळाला.