कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागात किरकोळ विक्रीस बंदी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोठी येथील कै.दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीपाला विभागात जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार किरकोळ विक्रीस बंदी करण्यात आली आहे.

भाजीपाला विभागात किरकोळ खरेदी करणार्‍या ग्राहकांनी गर्दी न करण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती आभिलास घिगे, उपसभापती संतोष म्हस्के व फळे- फुले भाजीपाला असोसिएशनच्या सर्व सभासदांनी केले आहे.

कै.दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला विभागात सकाळी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर ठिकाणी किरकोळ विक्री होणार नसून,

बाजाराच्या आवारात किरकोळ विक्रीसाठी गर्दी करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मार्केट कमिटीच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच सर्व मार्केट मधील गाळेधारकांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे सांगण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24