अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- मंत्री छगन भुजबळांच्या मध्यस्थीनंतर फटाके बंदीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. यामुळे यंदाची दिवाळी धुमधडाक्यात होणार हे नक्की झाली आहे.
मात्र त्याच पूर्वी एका व्हायरल मेसेजमुळे बाजारात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र याप्रकरणी फटाका व्यापारी असोसिएशन तर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
यामुळे दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे. फटाके हे शिव्काशी तामिळनाडू येथेच बनवून संपूर्ण भारतात विक्रीस जात असल्यामुळे चीन चे कोणतेही फटाके मार्केट मध्ये आलेले नाहीत त्यामुळे नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाही.
फटाके हे फक्त भारतीय बनवातीचेच असल्यामुळे फटाके वाजवून दिवाळी साजरी करा असे आवाहन दि अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकान्वये केली आहे. हि आहे व्हायरल पोस्ट … पाकिस्तान भारतावर थेट हल्ला करू शकत नसल्याने त्याने भारताकडून बदला घेण्याची मागणी चीनकडे केली आहे.
भारतात दमा पसरवण्यासाठी चीनने विशेष प्रकारचे फटाके भरले आहेत, जे कार्बन मोनोऑक्साईड वायूला विषारी आहेत. अश्या प्रकारची माहिती पोस्ट होत आहे. नेमकी काय आहे सत्यता ?
जाणून घ्या वास्तविक पाहता असे कोणतेही फटाके अहमदनगर जिल्ह्यात अगर इतर कोठेही पाहण्यास मिळाले नाहीत. फटाके हे भारतात फक्त शिव्काशी तामिळनाडू मध्येच मोठया प्रमाणात तयार केले जात असल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही.
सदर पोस्ट ही नागरिकांमध्ये भय निर्माण करण्याचे दृषहेतूने व दिवाळी सणावर निर्जन करण्याचे हेतूने काही समाज कंटक पोस्ट करत आहेत.
सदरील पोस्ट मुळे नागरिकांबी घाबरून न जाता आपल्या भारतीय संस्कृती व परंपरे प्रमाणे दिवाळी सण हा फटाके वाजवूनच साजरा करावे असे आवाहन करण्यात आले आहे.