महसूल मंत्री नामदार थोरात यांनी केली अकोलेतील 0 ते 28 कालव्याच्या कामाची पाहणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामाला महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत गती दिली गेली असून या कालव्यांसाठी धरणा लगतचा महत्त्वपूर्ण आयसीपीओ बोगदा खुला करताना नामदार थोरात यांनी अकोले तालुक्यातील 0 ते 28 किलोमीटर लांबीच्या कालव्याची पाहणी केली असून उजवा व डावा कालवा जलद गतीने पूर्ण करून सोबतच 2022 पर्यंत सर्वांना पाणी मिळेल यासाठी काम करण्याच्या सूचना महसूलमंत्री नामदार थोरात यांनी दिल्या आहेत

निळवंडे धरण येथे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते धरणालगतच्या महत्त्वपूर्ण बोगदा ब्लास्टिंग करून खुला करण्यात आला तसेच अकोले तालुक्यातील 0 ते 28 लांबीच्या कामाची पाहणी नामदार थोरात यांनी केली यावेळी समवेत अशोकराव भांगरे मीनानाथ पांडे, अमित भांगरे,

विक्रम नवले, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप हासे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, कालवा कृती समितीचे उत्तमराव घोरपडे ,नानासाहेब शेळके, मंदाताई नवले, भास्कराव आरोटे , उत्कर्षा रुपवते ,परबत नाईकवाडी, पाटील बुवा सावंत ,भास्करराव दराडे रामहरी कातोरे,

अजय फटांगरे, भारत मुंगसे, बाळू नाईकवाडी ,प्रांत अधिकारी शशिकांत मंगरुळे तहसीलदार मुकेश कांबळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद माने, विवेक लव्हाट, श्रीमती संगीता जगताप ,

तहसीलदार अमोल निकम यांसह संगमनेर अकोले मधील विविध कार्यकर्ते उपस्थित होते याप्रसंगी धरणालगत असलेल्या आयसीपीयू या महत्त्वपूर्ण बोगद्याचे ब्लास्टिंग करून कालव्यांसाठी खुले करण्यात आले.

हा दुष्काळी भागासाठी अत्यंत सुवर्ण क्षण ठरला असून यावेळी या नामदार थोरात यांनी म्हाळादेवी येथील ऍक्युरेड एरिया, मेहेंदुरी, बहिरवाडी, उंचखडक खुर्द ,ढोकरी, खानापूर ,रेडे, सुगाव खुर्द ,कुंबेफळ,

कळस खुर्द तांभोळ यासह सर्व ठिकाणी सुरू असलेल्या स्ट्रक्चरल कामाची पाहणी केली .. यावेळी महसूल मंत्री नामदार थोरात म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला वरदान ठरणार्‍या या धरणाच्या कामासाठी आपण सातत्याने पाठपुरावा केला.

अनंत अडचणींवर मात केल्यानंतर धरणाची भिंत उभी राहिली. दुष्काळी भागाला पाणी देण्याकरता मोठमोठ्या बोगद्यांची कामेही पूर्ण केली. मात्र 2014 ते 19 या कालावधीत कामे पूर्णपणे ठप्प होती .2019 नंतर या कालव्यांना पुन्हा गती दिली.

2022 च्या पावसाळ्यापर्यंत उजव्या व डाव्या या दोनही कालव्यांची कामे पूर्ण करण्यासाठी धरणाच्या इतिहासात सर्वात जास्त 495 कोटी रुपयांचा निधी मागील वर्षी दिला. या कामांसाठी निधी कमी पडणार नाही.

दोन्ही कालव्यावरील विविध पूल स्ट्रक्चरल कामे लवकरात लवकर पूर्ण करून 2022 पर्यंत एकाच वेळेस दोन्ही कालव्याद्वारे दुष्काळग्रस्त लाभार्थींना शेतकर्‍यांना पाणी मिळेल यासाठी अत्यंत जलद गतीने काम सुरू आहे .

हे पाणी दुष्काळग्रस्तांच्या शेतीत जाईल तोच खर्‍या अर्थाने आपल्या जीवनातील आनंदाचा दिवस ठरणार आहे . धरणा लगत चा बोगदा खुला झाल्याने हा या धरणाच्या इतिहासातील आणखी एक सुवर्णक्षण ठरला आहे.

हे सर्व काम अंतिम टप्प्यात येते आहे हे अत्यंत सुखदायी आहे. या सर्व कामी माजी मंत्री मधुकरराव पिचड, आमदार किरण लहामटे याचेसह अकोले तालुक्यातील शेतकरी व नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले आहे.

हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे व शेतकर्‍यांच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा हाच आपल्या जीवनाचा ध्यास असल्याचे ते म्हणाले यावेळी पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांना जलदगतीने कामासाठी विविध सूचना महसूल मंत्री नामदार थोरात यांनी केल्या तर मीनानाथ पांडे म्हणाले की,

अकोले तालुक्यातील शेतकर्‍यांनी कायम निळवंडे कालव्यांना मोठे सहकार्य केले आहे . पुनर्वसितांचे अनेक प्रश्न नामदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने सोडवले आहेत. उर्वरित शेतकर्‍यांचे जे काही थोडे फार प्रश्न राहिले आहेत ते ही नामदार थोरात हे सोडवत आहेत .

अकोले तालुक्यातील नागरिकांना नामदार बाळासाहेब थोरात यांचे कायम सहकार्य असल्याचेही ते म्हणाले याप्रसंगी, शिवाजी नेहे, सतीश पाचपुते अरिफ तांबोळी, सुकलाल गांगवे, रंगनाथ निर्मळ, दिनकर कडलग आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

अहमदनगर लाईव्ह 24