ताज्या बातम्या

महसूलमंत्री म्हणाले…“जे एअर इंडिया, रेल्वे विकतात, त्यांनी एसटीवर बोलू नये”

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2021 :-  राज्य शासनामध्ये एसटी महामंडळाचं विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मात्र यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही आहे.

दरम्यान भाजपा एसटी कर्मचाऱ्यांचा संप पेटवण्याचा प्रयत्न करत आहे हे उघड आहे. खरं म्हणजे ज्यांनी एअर इंडिया विकली, रेल्वे विकतायत, त्यांना आता एसटीवर बोलण्याचा अधिकार नाही.

अशी परखड टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. पुढे बोलताना मंत्री थोरात म्हणाले कि, एसटी कामगारांच्या हिताची जपणूक महाविकास आघाडीने आत्तापर्यंत केलेली आहे.

अजूनही परिवहन मंत्री त्यांच्याशी चर्चा करत आहेत. लवकरच मार्ग निघेल. आमचीही परिवहन मंत्र्यांशी चर्चा चालू आहे. दरम्यान भाजपा हा संप अधिक पेटवण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनीही एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच भाजपावर टीकाही केली आहे. ते म्हणाले, “आम्ही आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही.

पण विलिनीकरणाचा मुद्दा हा समितीच्या माध्यमातूनच सोडवला जाईल. आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे. पण कुणाच्या सांगण्यावरून किंवा भडकवण्यावरून आंदोलन करू नये.

राजकारणासाठी काही लोक कामगारांना उचकवत आहेत. न्याय मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही नुकसान करून घेऊ नका”.

Ahmednagarlive24 Office